रवी वाळके/ दे दणका न्यूज मुल
बछड्याचा समावेश नाही. जवळपास दीड ते दोन वर्षांनंतर वाघीण आपल्या बछड्याला सोडत असल्याने ते आपले अधिराज्य निर्माण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी पुढे सरसावतात.
केव्हा शिकारीसाठी तर केव्हा पाण्यासाठी हे बछडे भटकत मूल येथील नॉन बफर मध्ये येत हल्ले करीत असल्याचे दिसून येत आहेत.नॉन बफर मध्ये घनदाट जंगलाचा अभाव असल्याने मानवाला सहजच हेरून हल्ला चढविला जातो. त्यामुळे बफर पेक्षा नॉन बफर मध्ये जंगलाचा अभाव असतानाही वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. यावर वनविभागाने चिंतन करणे गरजेचे झाले आहे.
मानव प्राणी संघर्ष हा नवीन नाही. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेले वाघाचे हल्ले चिंताजनक वाटायला लागले आहेत. बफर झोन मध्ये १६ गावे येत असुन ३८ वाघांची संख्या नोंद झाली आहे.
संपूर्ण गावे जंगलाच्या सानिध्यात मानव वस्ती आहे. त्यामुळे वाघ, बिबट व इतर l हिंस्र प्राण्याचे नेहमीच दर्शन होत असते. त्यामुळेच की काय येथील जनतेनी भविष्यातील धोका ओळखुन आपल्या जगण्याच्या शैलीवर बदल करीत जीवन जगण्याचा नवीन उपाय शोधला आहेm त्यामुळे या बफर झोनमध्ये मध्ये वाघाचे हल्ले कमी मात्र मूल तालुक्यातील चिचपल्ली व सावली वनपरिक्षेत्रातील गावात वन्य प्राण्याचे हल्ले वाढल्याचे दिसत आहे. बफर झोन मधील वाघाचे बछडे शिकार व पाण्यासाठी
नॉन बफर मध्ये भटकत येऊन
संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी प्रमाणात असल्याने नदी, नाले, ओढे आटायला लागले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी डिसेंबर जानेवारी महिन्यात प्राण्याची भटकंती वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या वन्यप्राण्यांची संख्या लक्षात घेता मूल तालुक्यातील अनेक नॉन बफर गावात हल्ल्याचे प्रमाण जास्त असल्याचे जात आहे. वनविभागाने योजनबद्ध आखणी करून गावात वन्यप्राण्यांचे हल्ले होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मूल बफर व सावली, चिचपल्ली नॉन बफर मधील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारी क्षेत्रात कर्मचारी व गावकऱ्यांना अलर्ट करून गावात हल्ले होणार नाही असे नियोजन करण्याची मागणी जनतेनी केली आहे.
✍️✍️✍️✍️✍️
संपादक
रवी वाळके
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
बातम्या व जाहिरात करीता संपर्क करा
मो,9552358222
