मूल नगर पालिकेतील सफाई कामगार बोनससाठी रस्त्यावर,


कंपनीचे आश्वासन हवेत विरले!
मूल शहरात कच-याचे साम्राज्य!

रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 
नगर परिषद मूल येथील सफाई कामगार आपल्या हक्काच्या बोनस साठी रस्त्यावर उतरले आहेत.मागील चार दिवसांपासून त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाकडे संबधीत कंत्राटदार आणि नगर पालिका प्रशासनाने पाठ फिरवली आहे. हक्काच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने मूल मध्ये चार दिवसांपासून स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.ठिकठिकाणी कच-याचे साम्राज्य उभे ठाकले असून घरोघरी जावून उचलला जाणारा कचरा सुदधा कचरा पेटीत साचल्या गेला आहे.सफाई कामगारांना बोनस न मिळाल्यास हा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता आहे .

 अर्बन एन्वहायरो कंपनी मार्फत मूल मध्ये स्वच्छतेचा कंत्राट घेण्यात आला आहे.दिवाळीच्या सणात सर्वांना बोनस देण्याचे  आश्वासन देण्यात आले. दिवाळी सणात पगार दिला.मात्र बोनस दिला नाही.दिवाळी सणातील बोनस कामगारांसाठी अतिशय महत्वाचा विषय असतो.त्याच मुददयांकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याने सफाई कामगारांनी नगर पालिका प्रशासनाविषयी आणि कंपनी विषयी असंतोष व्यक्त करीत सरळ आंदोलनाचा मार्ग निवडला.शनिवार पासून सुरू असलेल्या त्यांच्या या बेमुदत आंदोलनाला प्रशासनाने कोणताही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही.त्यामुळे कामगारांनी ठियाया आंदोलन पुकारले आहे.आश्वासन देवूनही दिवाळी बोनस नाकारला.तसेच दोन महिण्यांपासून सुरक्षा किट सुदधा दिली नाही. सफाई कामगारांच्या संपामुळे शहरातील प्रभागात व रस्त्यांवर ठिकठिकाणी कच-याचे साम्राज्य निर्माण झाले असून घरोघरी उचलल्या जाणा-या कच-याला सुदधा ब्रेक लागला आहे. सफाई कामगारांच्या मागणी कडे अर्बन एन्व्हायरो कंपनी दुर्लक्ष करीत असतानाही नगर पालिका प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचा संताप कामगारांनी व्यक्त केला आहे.सफाई कामगारांचे आंदोलन अधिक चिघळल्यास शहरातील परिस्थीती अधिक बिकट होण्यास वेळ लागणार नाही,अशी भिती जनतेने व्यक्त केली आहे.तुर्तास सफाई कामगारांच्या आंदोलनामुळे ऐन दिवाळी सणांच्या दिवशी  शहर कच-याच्या साम्राज्यात सापडले आहे.सफाई कामगारांना बोनस सह सुरक्षा किट मिळावी अशी मागणी इंटक चे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी केली आहे.

✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
बातम्या व जाहिरात करीता संपर्क करा 
मो,9552358222