भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी मूल शहराच्या वतीने अभिवादन



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

आदिवासी समाजाचे महानायक, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील थोर जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी मूल शहराच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि अन्यायाविरुद्ध दिलेला संघर्ष भारतीय इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी समाजाला स्वाभिमान, एकता आणि संघर्षाची दिशा दिली.
या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आणि देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी मूल शहराच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या त्याग, संघर्ष आणि देशभक्तीला अभिवादन करण्यात आले. यावेळी मूल तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी मूल शहराच्या वतीने अभिवादन केले, 
✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
बातम्या व  जाहिरात करीता संपर्क करा, 
मोबा,9552358222