राणी हिराई रूरल मार्ट व सेंद्रिय निविष्ठा केंद्र सापडले कचऱ्याच्या कचाट्यात!



७० लाख रुपये खर्च करून बांधकाम होत असलेल्या इमारतीच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरज


रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती मूल च्या परिसरात दोन वर्षापूर्वी विकासात्मक बांधण्यात आलेले राणी हिराई रूरल मार्ट व सेंद्रिय निविष्ठा केंद्र कचऱ्याच्या कचाट्यात सापडले आहे. लाखो रुपये खर्च केल्यानंतरही ग्रामीण भागातील महिलांना त्याचा फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. याच केंद्राच्या जवळ पुन्हा ७० लाख रुपये खर्च करून रोजगार निर्मिती साठी निर्मिती कॉन्ट्रॅक्शन कंपनी चंद्रपूर च्या माध्यमातून 
 बांधकाम सुरू केले आहे. मात्र कामाचा दर्जा पाहिजे त्या प्रमाणात समाधानकारक नसल्याचे बोलले जात आहे. स्थानिक कंत्राटदार हे काम करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. घाई गडबडीत या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इमारतीचा दर्जा समाधानकारक असणे आवश्यक आहे. अन्यथा 
पहिली इमारत बेकाम झाली आहे. दुसरी इमारत देखील बेकाम होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उमेदच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तू निर्माण करून त्या विक्री करण्याचा प्रयत्न केला जात आहे.स्वंय रोजगार निर्मिती होत असल्याने अनेक महिलांची आर्थिक उन्नती होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र मूल येथील राणी हिराई रूरल मार्ट व सेंद्रिय निविष्ठा केंद्र महिलांना रोजगार निर्मितीपासुन दूर नेत असल्याचे दिसून येत आहे. कारण हे केंद्र गेल्या वर्षभरापासुन बंद असून या केंद्रा सभोताल लाकडे व माती पसरली असल्याने आतमध्ये जाऊन काम करणे कठीण झाले आहे. अशीच स्थिती ७० लाख रुपये खर्च करून नव्या इमारतीची होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. फक्त कंत्राटदाराचे पोट भरता यावे यासाठी तर तरतूद केली नाही ना? अशी प्रतिक्रिया जनता देताना दिसत आहे. खरोखरच महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 
 प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे. अन्यथा ७० लाख रुपये खर्च करून बांधलेली इमारतीचा दर्जा अंदाजपत्रकाप्रमाणे असणे आवश्यक आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा काही दिवसात ही इमारत 
देखील बेकाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
✍️✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क 
मोबा,9552358222