रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 
तालुक्याच्या एका टोकाला असलेल्या ग्राम पंचायत दाबगाव मक्ता येथील नालीचा उपसा गेल्या दोन वर्षापासून होत नसल्याने गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नालीचा उपसा न झाल्याने पाणी साचुन डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे गावात विविध प्रकारचे आजार बळावत असुन ग्राम पंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या गंभीर बाबींकडे लक्ष देण्याची मागणी जनतेनी केली आहे.

  दाबगाव मक्ता या गावाची लोकसंख्या १२६० असुन गावात अनेक सुविधांचा अभाव आहे. जनतेला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी दोन आर ओ प्लांट लावण्यात आले. मात्र एक प्लांट अनेक दिवसापासून बंद अवस्थेत असल्याने संपूर्ण गावाला एकाच प्लांट वरून पाणी न्यावे लागत आहे. काही दिवसापूर्वी हा प्लांट देखील बंद झाला होता त्यावेळी लांब अंतरावरून नजिकच्या गावात जाऊन पाणी आणावे लागत होते. या गावातील नाल्याची दुरावस्था झाली असुन गेल्या दोन वर्षापासून नालीचा उपसा करण्यात आलेला नाही. पर्यायाने गाव परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामसेवक रविंद्र चांदेकर हे मुख्यालयी राहत नसल्याने जनतेला विविध उपाययोजना करण्यासाठी वावच दिला जात नाही. त्यामुळे गावात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 

लोकमित्र उराडे, सामाजिक कार्यकर्ते दाबगाव मक्ता: ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामसेवकाकडे ही एकच ग्रामपंचायत असताना कित्येक दिवस गावात येत नसल्याने लोकांचे कामे होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नालीचा उपसा गेल्या दोन वर्षांपासून न झाल्याने गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

रविंद्र चांदेकर ग्रामसेवक दाबगाव मक्ता:- गावात नालीचा उपसा करण्यासाठी निधी उपलब्ध होता मात्र खर्च करण्यासाठी परवानगी नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून नालीचा उपसा करण्यात आला नाही. आता प्रशासनाची परवानगी आली आहे. त्यामुळे गावात नालीचा उपसा करून घेण्यात येणार आहे, 
✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
बातम्या व जाहिरात करीता संपर्क साधावा, 
मोबा,9552358222