दाबगाव मक्ता येथील आरो प्लांट मधील pyanal चोरीला, शुद्ध पाण्यासाठी जनतेची भटकंती!



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

ग्रामीण भागातील जनतेला मुबलक व शुद्ध मिळावे यासाठी प्रत्येक गावात लाखो रुपये खर्च करून आरो प्लांट बसविण्यात आला. अवघ्या पाच रुपयात शुद्ध पाणी मिळत असल्याने जनतेला मोठा दिलासा मिळायला लागला. या शुद्ध पाण्याने आजाराचे प्रमाण देखील कमी झाले आहे. ग्रामपंचायत दाबगाव मक्ता च्या अधिपत्याखाली असलेल्या आरो प्लांट मधील मशीन रात्री साडे बारा वाजता दरम्यान चोरीला गेली. गावातील कुणीतरी खोडसर व्यक्तीने पैशाच्या हव्यासापोटी मशीन चोरून नेली असावी अशी चर्चा सुरू झाली आहे. ग्राम पंचायत दाबगाव मक्ता येथील प्रशासक व ग्राम सेवक यांनी त्या खोडसर व्यक्तीचा शोध घेऊन मशीन हस्तगत करावी अन्यथा दुसरी मशीन लावावी अशी मागणी जनतेनी केली आहे. यासंदर्भात ग्रामसेवकांनी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दखल करावी जेणेकरून कुणाही पुढे हिंमत होणार नाही अशीही मागणी जनतेनी केली आहे.
✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
जाहिरात  व बातम्या करीता संपर्क 
मो,9552358222