मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता परिसरात वाघाने धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच भीतीच्या वातावरणात मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता येथील सुनिल मोतीराम कोडापे वय 50 वर्ष हे मौजा चक कन्हळगाव येथे कापूस वेचणीच्या कामासाठी 8 ते 10 मजुराच्या सोबतीने
गेला होता. कापूस वेचणीचे काम करीत असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. वाघाने अचानक हल्ला केल्याने सुनिल कोडापे याला काही सुचेनासे झाले. त्यामुळे वाघाने जास्त प्रमाणात जखमी केले. जवळच असलेल्या मजुरांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. ही माहिती वनविभागाला कळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमी इसमाला मूल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे. पुढील तपास वनविभाग व पोलिस करीत आहेत. अचानक झालेल्या हल्ल्याने दाबगाव मक्ता परिसरातील
शेतकरी मजूर भयभीत झाले आहेत. शेतीचा हंगाम असल्याने शेतीचे कामे कशी करावीत असा प्रश्न निर्माण झाला असून वनविभागाने
शेतात संरक्षण देण्याची मागणी जनतेनी केली आहे,
✍️✍️✍️✍️✍️✍️
संपादक
रवी वाळके
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
बातम्या व जाहिरात करीता संपर्क
मो,9552358222
