मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता येथे शेतकरी विजय नामदेव बुरांडे यांच्या बैलाच्या गोठ्याला 25 मार्च रोजी दुपारी अचानक भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत गोठ्यातील चारा, लाकूडफाटा, कवेलु तसेच शेतीची अवजारे जळून खाक झाली असून सुमारे 84,800 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच मूल नगर परिषद तसेच पोभुर्णा नगर पंचायतीच्या अग्निशामक दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
घटनेनंतर गावचे तलाठी मुन्ना राव व ग्रामसेवक चांदेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अचानक लागलेल्या आगीमुळे बुरांडे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्या उपजीविकेवरच मोठा परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर बाधित शेतकरी विजय बुरांडे तसेच ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत व भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे. “शेतकऱ्यांच्या अशा आपत्तीच्या वेळी शासनाने त्वरित मदतीचा हात द्यावा,” अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
✍️✍️✍️✍️✍️
संपादक
रवी वाळके
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क करा
मोबा,9552358222
