मूल शहरात मोकाट जनावरे व कुत्रे यासोबतच डुकराच्या त्रासाने नागरीक झाले हैराण!


रवि वाळके/दे दणका न्यूज मूल

 मूल शहरात सध्या मोकाट जनावरे, कुत्रे व 
  डुकरांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील सर्वच वॉर्डांत व मुख्य रस्त्यावर गुरे व कुत्रे गोळा होऊन ये जा करणाऱ्या वाहनांना बाधा पोहचावीत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.  डुकरांचा देखील त्रास वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र नगर प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
नगर परिषद मूल अंतर्गत एकूण १० प्रभाग असुन २० वार्ड आहेत. जवळपास सर्वच प्रभागात  मोकाट जनावरे व कुत्रे रात्री बेरात्री फिरत असतात. त्यामुळे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. याबाबत नगर परिषदेला नागरिकांनी तक्रार करून जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली तर लवकरच करू असे आश्वासन देण्यात येते मात्र ते आश्वासन गेल्या दोन महिन्यापासून पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. हिच स्थिती डुकरांची आहे. डुकरे केव्हाही नागरिकांच्या घरात शिरतात. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे  डेंग्यू, मलेरिया, काविळ या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्याची समस्या जटिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या मूल शहरात मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क करा 
मो,9552358222
.