शेतातील पिक घेताना शेतकऱ्यांना घ्यायची काळजी व उपाय योजना करता यावी यासाठी मूल तालुक्यातील भवराळा येथील ग्राम पंचायत कार्यालयाच्या सभागृहात खेत बचाओ मोहीम अंतर्गत रब्बी हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन चंद्रपूरचे आत्मा येथील प्रकल्प संचालक अरुण कुसळकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी सुनिल कारडवार होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी प्रशिक्षण केंद्र शिंदेवाहीचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण देशपांडे, मास्टर ट्रेनर वामन बोरकुटे, प्रगतिशील शेतकरी आनंदराव शेंडे, साहाय्यक कृषी अधिकारी शिल्पा मंत्रीवर, लता सावसागडे , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जितू झोडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रकल्प संचालक अरुण कुसळकर यांनी रब्बी हंगाम नियोजनातील कोणकोणते पीक घ्यावे त्यांची कार्यपद्धती कशी राहील याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. तर सुनील कारडवार, तालुका कृषी अधिकारी सुनिल कारडवार यांनी कृषी विभागातील विविध योजना, महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या अनुदान व विविध योजना खेत बचाओ मोहीम अंतर्गत रब्बी हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला.
✍️✍️✍️✍️✍️
संपादक
रवी वाळके
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
बातम्या व जाहिरात करीता संपर्क करा
मो,9552358222
