विश्रामगृह ते सोमनाथ व नागपूर गडचिरोली
कडे जाणारा रस्ता शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणारे असल्याने या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते.
हा रस्ता अरुंद असून या मार्गावरील असलेल्या दुकानासमोर विक्री करण्यासाठी वस्तू ठेवल्या जात असल्याने नेहमी मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद प्रशासनाने अनेकदा अतिक्रमण हटविले मात्र काही दिवसातच जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याने अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जनतेची डोकेदुखी वाढली आहे.
नागपूर गडचिरोली व विश्रामगृह सोमनाथ कडे जाणारे रस्ते नेहमी वर्दळीचे असतात. विश्रामगृह -सोमनाथ कडे जाणारा
रस्ता अरुंद असला तरी या मार्गावरून सतत दुचाकी व चाकी वाहनाची गर्दी असते. या मार्गावर स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक, व इतर दुकाने असल्याने विविध वस्तू घेण्यासाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने पार्किंग करतात तसेच दुकानदार देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या वस्तू अगदी रस्त्याच्या कडेला ठेवत असल्याने मार्ग काढण्यास अडचणीचे जात असते. याच मार्गावर दोन माध्यमिक शाळा असल्याने विद्यार्थ्याची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते.
हिच स्थिती सोमनाथ कडे जाणाऱ्या रस्त्याची आहे. गांधी चौक ते सोमनाथ रस्त्यापर्यंत कापड दुकाने, किरण मॉल व इतर दुकाने आहेत. या दुकानात येणारे ग्राहक देखील रस्त्याच्या कडेला आपली वाहने पार्किंग करीत असल्याने समोरासमोर दोन वाहने जाण्यास अडचणीचे जात असते. त्याच दुचाकीची वाहतूक सतत असल्याने वाहतुकीचा खेडखंडोबा होताना दिसत आहे. नागपूर गडचिरोली मार्गावर देखील हिच स्थिती आहे. दुकानाबाहेर साहित्य ठेवल्याने वाहधारकाना मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या सर्व दुकानांना पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. भविष्यात विश्रामगृह ते सोमनाथकडे जाणारा रस्ता व नागपूर गडचिरोली मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची रस्त्यावर वाहने व
दुकानदारांनी आपली विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू रस्त्याच्या कडेला ठेवण्यास मज्जाव करणे आवश्यक झाले आहे. याकडे नगर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
✍️✍️✍️✍️✍️✍️
संपादक
रवी वाळके
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क
मोबा,9552358222
