तलावात मूल नगर परिषदेने सौंदर्यीकरणासाठी केले करोडो रुपये खर्च, मात्र काम अर्धवटच !


झाडे झुडपे वाढल्याने भीतीचे वातावरण!
नगर परिषददेने लक्ष देण्याची गरज 








रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

मूल शहराला लागून असलेल्या विहिरगाव तलाव जिल्हा परिषद लघु सिंचाई उपविभाग मूल च्या अधिपत्याखाली आहे. या तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी नगर परिषद मूल ने करोडो रुपये खर्च केले. मात्र आजही काम अर्धवट असुन शहरवासीयांना विरंगुळा करता यावा यासाठी केलेल्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने सौंदर्यीकरण भकास होऊन झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे नागरिकांना फेरफटका मारण्यास भीती वाटत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.करोडो रुपयेकेलेला खर्च पाण्यात गेल्याची चर्चा मूल शहरात सुरू झाली आहे.


बसस्थानक मूल जवळील असलेल्या मामा तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी जवळपास तिन कोटी रुपये खर्च करण्यात आले. पर्यटन विभागाने केलेले सौंदरीकरणाचे काम निधी अभावी अर्धवट थंड्याबस्त्यात पडले आहे. असे असताना दुसरा मूल शहराजवळील विहिरगाव तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेतला. जवळपास २ कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात आले. मात्र ते काम देखील अर्धवट आहे. यात मोठ मोठी झाडे वाढली असून ये जा करण्यास नागरिकांना भीती वाटत आहे. ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी हा खटाटोप केला की काय? असा प्रश्न नागरिकांनी नगर प्रशासनाला विचारला आहे. नगर परिषद प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन रगडलेले सौंदरीकरणाचे काम पूर्ण करावे व वाढलेली झाडे झुडपे साफ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क साधावा 
मोबा,9552358222