मोती टहलियानी यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैंषव यांचे कडे केली मागणी
व्यापारी दृष्टीकोनातून मूल शहर हे मध्यवर्ती ठिकाण असुन परिसरातील रहिवासी व नियमित रेल्वे प्रवाशांना व्यापार, शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच शासकीय व प्रशासकीय कामांसाठी गोंदिया, जबलपूर आणि मध्य प्रदेशातील इतर शहरांमध्ये वारंवार प्रवास करावा लागतो. चांदा फोर्ट ते जबलपूर दरम्यान धावणारी एक्सप्रेस रेल्वे या मार्गावरील एक अत्यंत महत्त्वाची रेल्वे सेवा आहे. मात्र, दुर्दैवाने या रेल्वेचा मूल-मरोडा रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याने मूल व आसपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेण्यापासून वंचित व्हावे लागत आहे. यासाठी मूल येथे थांबा देण्याची मागणी मूल येथील व्यापारी मोती टहलियानी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैंषव यांचेकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
मूल मारोडा रेल्वे स्थानकावरून फोर्ट–जबलपूर एक्सप्रेस रेल्वे जात असताना देखील थांबा नसल्याने स्थानिक प्रवासी रेल्वेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे या भागातील जनतेला भेडसावणाऱ्या अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. मूल-मरोडा हे एक महत्त्वाचे व वर्दळीचे रेल्वे स्थानक असून येथून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र, या रेल्वेचा लाभ घेण्यासाठी त्यांना चांदा फोर्ट किंवा इतर दूरच्या स्थानकांवर जावे जाऊन बसावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठ्या गैरसोयीचा तसेच अतिरिक्त आर्थिक खर्चाचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील व्यापारी व नोकरी करणाऱ्या नागरिकांचा वेळ विनाकारण वाया जात आहे. चांदा फोर्टहून सुटणाऱ्या या रेल्वेसाठी मूल-मारोडा हे महत्त्वाचे स्थानक असून येथे थांबा दिल्यास रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होऊ शकते. जनहिताच्या दृष्टीने चांदा फोर्ट–जबलपूर एक्सप्रेस 22173 / 22174 रेल्वेला मूल-मारोडा रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर किमान २ मिनिटांचा थांबा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी मोती टहलियानी यांनी
माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फतीने रेल्वे मंत्री अश्विनी वैंषव यांचेकडे केली आहे.
👇👇👇👇👇
संपादक
रवी वाळके
दे दणका न्यूज मुल
जाहिरात व बातम्या करीता संपर्क साधावा
मो,9552358222
