धाब्यावर जेवन करून घरी परत येत असतांना भरधाव वाहनाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात
एकाचा मृत्यु तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मूल शहरा जवळील भोपाल गॅरेज जवळ घडली. मूल गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर मूल पासुन 2 कि.मी. अंतरावर असलेल्या वळण मार्गावर स्कोडा क्र. एमएच-31-1857 चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर वाहन मार्गालगतच्या शेतात बऱ्याच अंतरावर जाऊन पडले. झालेल्या अपघातात मंगेश रोडे नामक युवकाचा मृत्यु झाला तर सी . ए. असलेले वाहन चालक सावन बुटे, प्रणय शिरपुरे आणि राहुल आगबत्तनवार हे जखमी झाले. अपघाताची माहिती होताच नागरीकांनी जखमींना वाहनामधुन काढत प्राथमिक उपचारा करीता मूल उपजिल्हा रूग्णालय येथे हलविले. त्यानंतर जखमींची परिस्थिती लक्षात घेवुन योग्य उपचाराकरीता चंद्रपुर येथे हलविले, दरम्यान उपचाराकरीता नेत असतांनाच मंगेश रोडे यांचा मृत्यु झाला. रविवार असल्याने चौघेही मित्र नागपूर मार्गावरील एस. के. धाबा येथे जेवन करण्यास गेले होते. जेवण करून ते परत येत असताना हा अपघात झाला.
जखमींची परिस्थिती लक्षात घेवुन योग्य उपचाराकरीता चंद्रपुर येथे हलविले. दरम्यान उपचाराकरीता नेत असतांनाच मंगेश रोडे यांचा मृत्यु झाला. रविवार असल्याने चौघेही मित्र नागपूर मार्गावरील एस. के. धाबा येथे जेवन करण्यास गेले होते. जेवन आटोपुन घरी परत येत असतांना रात्रो अंदाजे 11 वाजताचे सुमारास सदर अपघात घडला. अपघातामध्ये जखमी झालेले सावन बुटे आणि प्रणय शिरपुरे हे सनदी लेखापाल (सी.ए.) आहेत तर राहुल आगबत्त्नवार यांचे गांधी चौक मूल येथे इलाईट मोबाईल शॉपी आहे. पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.
संपादक
रवी वाळके
दे दणका न्यूज
जाहिरात व बातम्या करीता संपर्क करा
मोबा,9552358222
