पडीत असलेली ६८.९१ हेक्टर शेतजमीन मजगीच्या कामानेझाली पिकायोग्य!



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

पडीत जमीन ही नापिकी असल्याने त्यात पिक घेणे शेतकऱ्याला अवघड जात होते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने मजगीचे काम शेती सुधारणा करण्याचा उपक्रम राबविला. त्या अनुषंगाने मूल तालुक्यातील चार गावात मजगीचे कामे करण्यात आली यात ७२ शेतकऱ्यांची ६८.९१ हेक्टर जमिनीचे क्षेत्र पिकायोग्य झाली आहे. या कामांमुळे शेतजमिनींची उर्वरता आणि उत्पादनक्षमता वाढण्यास मदत झाली आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूल अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षात पडीत असलेल्या शेत जमिनी सुधारण्यासाठी मजगीची भरीव कामे हाती घेण्यात आली. यात मूल तालुक्यातील मुरमाडी, काटवन, बेंबाळ व मानकापूर या चार गावात शेत जमिनीची सुधारणा करण्यात आली आहे. या माजगीच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सुधारल्या असून पिक घेण्यास योग्य झाल्या आहेत. शेतीची सुधारणा झाल्याने सध्या धानाचे पिक घेतले आहे. या सुधारणांमुळे पाण्याचा निचरा सुधारला आहे व पिकांची वाढ समाधानकारक दिसत आहे. धानाचे पीक निघाल्यानंतर शेतकरी तूर, लाखोडी, मूग, उडीद आणि मोहरी अशी पर्यायी पिके घेण्याची तयारी करीत आहेत. पडीत जमिनीमुळे शेतकरी शेतीकडे जाण्यास धजत नव्हते मात्र आता शेतजमिनीची सुधारणा झाल्याने शेतकरी वेळोवेळी शेतीकडे लक्ष देत नवनवीन पिके घेण्याबाबत प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाने शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

सुनिल कारडवार तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूल:- 
पडीत असलेल्या शेत जमिनी माजगीच्या माध्यमातून सुधारणा होत आहेत. सन २०२५ -२६ या वर्षात मूल तालुक्यात मजगीचे भरीव कामे करण्यात आली आहेत. या कामामुळे ७२ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची सुधारणा झाली असुन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, 

✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क करा 
मोबा,9552358222