रेती परवानाधारक करीत आहेत शर्ती व अटींचे उलंघन !
रेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या मूल तालुक्यातील नदी घाटाची रेती दर्जेदार असल्याने रेतीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. या वर्षात १२ नदी घाटांची रेती उपसा करण्यासाठी चंद्रपूरच्या जिल्हा खनिजकर्म अधिकारी कार्यालयाने परवानगी अटी व शर्ती नियमाच्या अधीन राहुन दिली आहे. मात्र दिलेल्या अटी व शर्तीचे पालन न करता रेतीचे उत्खनन व वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.१५ मे ला जिल्हा खनिजकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध रेतीची वाहतूक करीत असताना दोन हायव्हा ट्रक पकडले आहेत. वरिष्ठ अधिकारी कारवाई करतात तर तालुका प्रशासनाला या बाबत कुंभकर्णी झोपेत आहे का ? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे.
रेतीची उत्खनन व वाहतूक करण्यासाठी दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. यात महसूल विभागाला देखील मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. मात्र दिलेल्या परवानाच्या अटी व शर्तीचे उलंघन करून रेती तस्कर मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ करून घेत असतात.या वर्षात १२ नदी घाटांची रेती उपसा करण्यासाठी चंद्रपूरच्या जिल्हा खनिजकर्म अधिकारी कार्यालयाने परवानगी अटी व शर्ती नियमाच्या अधीन राहुन दिली आहे. असे असताना १५ मे ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन हायवा ट्रक क्रमांक एम. एच.३४ बीजी १०८८, एम. एच.३४ बीजी १०८१ अवैध रेतीची वाहतूक करतांना पकडले. यावरून दररोज अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे.खनिजकर्म विभागाने दिलेल्या अटी व शर्ती नुसार नदीपात्रातील रेतीचा उपसा केवळ हाताने (मॅन्युअली) करणे बंधनकारक आहे. रेती काढण्यासाठी किंवा ती वाहनात भरण्यासाठी पोकलेन, जेसीबी किंवा सक्शन पंपासारख्या यांत्रिक साधनांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. सूर्योदयापूर्वी व सूर्यास्त नंतर रेतीची वाहतूक करू नये असाही नियम असताना याच वेळेतच सर्रासपणे रेतीचे ट्रक धावताना दिसतात. तसेच एकाच परवान्यावर दिवसभर रेतीची वाहतूक केली जाते. हे प्रशासनाला माहीत असताना देखील झोपेचे सोंग घेऊन रेती तस्करांना अभय दिले जात असल्याची चर्चा आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
वसीम सय्यद जिल्हा खनिजकर्म अधिकारी चंद्रपूर:-
अवैध रेतीची वाहतूक करतांना मूल येथे दोन हायवा ट्रक पकडले आहे. याबाबत तहसिल कार्यालय मूल येथील तहसीलदारांना नोटीस देऊन खुलासा देण्याविषयी सांगण्यात आले आहे. त्यानंतर संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात तहसीलदार यांना अवैध रेतीची वाहतूक होणार नाही याबाबत अलर्ट राहण्याविषयी सांगितले आहे.
👇👇👇👇👇
संपादक
रवी वाळके
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क करा
मो,9552358222
