तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर रानडुकराने हल्ला केल्याने मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता येथील सिकंदर फरीदा गेडाम (वय 72) हे गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडे सात वाजता दरम्यान घडली. जखमी सिकंदर गेडाम यांना मूल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मूल तालुक्यात घनदाट जंगल असल्याने वाघ, बिबट, रानडुकर यांचा मोठा वावर आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता भीतीयुक्त वातावरणात जंगलातील कामे करीत असतात.
सध्या तेंदु पत्ता गोळा करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक लोक जात असतात. भारतील ग्रामीण जनतेचा हा मोठा रोजगार असुन यात वनविभागाच्या वतीने बोनस देखील दिला जातो. त्यामुळे गावातील बहुतेक लोक तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी जात असतात. नेहमी प्रमाणे आपल्या सहकाऱ्यासोबत दाबगाव मक्ता येथील सिकंदर फरीदा गेडाम हे देखील सकाळी डोंगर हळदी वनपरिक्षेत्रात कक्ष क्रमांक 647सध्या मध्ये जाऊन पाने तोडीत असताना रान डुकराने अचानक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांचेवर मूल च्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या रान डुकराच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून रानटी जनावरांचा होत असलेल्या हल्ल्यावर पायबंद घालण्यासाठी वनविभागाने तेंदुपत्ता तोडायला जाणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देण्याची व जखमी झालेल्या या व्यक्तीला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
संपादक
रवी वाळके
दे दणका न्यूज मुल
जाहिरात व बातम्या करीता संपर्क करा
मोबा,9552358222
