दाबगाव मक्ता येथील मामा तलावाचे निकृष्ठ होत असताना जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष!


चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी 
 


रवि वाळके /दे दणका न्यूज मूल

मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता येथील शेतकऱ्यांना लाभदायक असलेल्या सर्व्हे नंबर ७२ मधील मामा तलाव दोन वर्षापूर्वी पावसाळ्यात अती पावसाच्या दाबाने फुटल्याने परिसरातील शेकडो शेतकरी बाधित झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांपासून वंचित व्हावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतत पाठपुरावा करून तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या तलावाच्या पुनर्बाधणी व मजबुती करणासाठी २६ लाख रुपये मंजुर करण्यात आले. काही महिन्यापूर्वी कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र सदर काम 
 जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत असलेल्या उपविभागीय अधिकारी जलसंधारण उपविभाग मूल यांच्या मार्फतीने होत असून संपूर्ण काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे. त्यामुळे सदर कामाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.



  मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता या गावातील 
 मामा तलाव दाबगाव तुकुम म्हणून ओळखला जात असुन सर्वे नंबर ७२ असलेल्या या तलावाजवळ शेकडो शेतकऱ्यांच्या शेत जमिनीसाठी वरदान ठरत आहे.शेतीच्या पिकासाठी हा वरदान असणारा हा तलाव असुन या तलावाच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे या तलावाची पाळ कमकुवत होत गेली. मागील दोन वर्षापूर्वी जुलै ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस सतत पडत असल्याने तलाव तुडूंब भरला.तलावाच्या दुरूस्ती अभावी तलावाची पाळ कमकुवत झाल्याने तलावातील पाणी रोखण्यास असमर्थ झाली. त्यामुळे संपुर्ण पाण्याचा लोंढा तलावाच्या पाळीवरून वाहायला लागले. याचा परिमाण असा झाला की,परिसरात असलेल्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. यासदर्भात माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कडे देखील पाठपुरावा करण्यात आला. तसेच 
 तहसीलदार मूल यांचेकडे देखील याबाबतची आपबिती सांगितली. सदर तलावाची दुरुस्ती करण्याची सततची 
मागणी लक्षात घेता जलसंधारण विभागाने २६ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला. काही महिन्यापूर्वी या तलावाचे मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ते निकृष्ठ दर्जाचे होत आहे. निधी वारंवार मिळत नसल्याने एकदाच मात्र मजबूतपणे तलावाचे काम व्हायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे सबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तलावाच्या कामाची चौकशी करावी. दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी व काम व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता प्रवीण देठे यांचेशी संपर्क केले असता त्यांनी मोबाईलला प्रतिसाद दिला नाही 

श्री. चरणदास वाळके शेतकरी दाबगाव मक्ता ता. मूल:- मामा तलावाच्या पुनर्बाधणी व मजबुती करणासाठी २६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सदर काम करण्यात आले असून काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. त्यामुळे जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी. तसेच काम पुन्हा व्यवस्थित करण्यात यावे.
अन्यथा आक्रमक भूमिका घेतली जाईल.

✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क करा 
मोबा,9552358222