दाबगाव मक्ता येथील मामा तलावाचे काम होत आहे निकृष्ठ !


जिल्हा परिषद जलसंधारण विभागाने लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी 
 


रवि वाळके /दे दणका न्यूज मूल

मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता येथील सर्व्हे नंबर ७२ मधील मामा तलाव दोन वर्षापूर्वी पावसाळ्यात अती पावसाच्या दाबाने फुटल्याने परिसरातील शेकडो शेतकरी बाधित झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांपासून वंचित व्हावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतत पाठपुरावा करून तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या तलावाच्या पुनर्बाधणी व मजबुती करणासाठी २६ लाख रुपये मंजुर करण्यात आले. काही महिन्यापूर्वी कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र सदर काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत आहे. त्यामुळे 
 जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत असलेल्या उपविभागीय अधिकारी जलसंधारण उपविभाग मूल ने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता या गावातील 
 मामा तलाव दाबगाव तुकुम म्हणून ओळखला जात असुन सर्वे नंबर ७२ असलेल्या या तलावाजवळ शेकडो शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आहेत.शेतीच्या पिकासाठी हा वरदान असणारा हा तलाव असुन या तलावाच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे या तलावाची पाळ कमकुवत होत गेली. मागील दोन वर्षापूर्वी जुलै ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस सतत पडत असल्याने तलाव तुडूंब भरला.तलावाच्या दुरूस्ती अभावी तलावाची पाळ कमकुवत झाल्याने तलावातील पाणी रोखण्यास असमर्थ झाली. त्यामुळे संपुर्ण पाण्याचा लोंढा तलावाच्या पाळीवरून वाहायला लागले. याचा परिमाण असा झाला की,परिसरात असलेल्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. यासदर्भात माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कडे देखील पाठपुरावा करण्यात आला. तसेच 
 तहसीलदार मूल यांचेकडे देखील याबाबतची आपबिती सांगितली. सदर तलावाची दुरुस्ती करण्याची सततची 
मागणी लक्षात घेता जलसंधारण विभागाने २६ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला. काही महिन्यापूर्वी या तलावाचे मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ते निकृष्ठ दर्जाचे होत आहे. निधी वारंवार मिळत नसल्याने एकदाच मात्र मजबूतपणे तलावाचे काम व्हायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तलावाच्या कामाची पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


श्री यादव बुरांडे शेतकरी दाबगाव मक्ता ता. मूल:- मामा तलावाच्या पुनर्बाधणी व मजबुती करणासाठी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काम एकदाच होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरावे यासाठी बांधकामाचा दर्जा उत्तम करण्यात यावा अशी आपली शेतकऱ्याच्या वतीने मागणी आहे.

✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क 
मोबा,9552358222