मानवी जीवनात आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी पाण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे पाणी हे जीवन आहे असे वारंवार म्हटले जाते. अशुद्ध पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होतात. त्यामुळे अनावश्यक पैसा खर्च होतो. हे टाळता यावे व लोकांना कमी किंमतीत शुद्ध पाणी देता यावे यासाठी मूल येथील भूपेश सुनील निमसरकर व अंजली मोतीराम वाघमारे या दोन युवकांनी विविध तर्क शुद्ध बाबींचा अभ्यास करून अंभु टेक प्रॉडक्ट फिल्टर ची निर्मिती केली आहे. महाराष्ट्र स्टार्ट उपयात्रेच्या निमित्याने चंद्रपूर येथील शासकीय तंत्र शिक्षण महाविद्यालय येथे याच प्रॉडक्टची प्रदर्शनी लावण्यात आली होती. त्यात दुसरा क्रमांक आला होता.यात दोन प्रॉडक्ट असून एक पिण्याचे व स्वयंपाक करण्यासाठी तर दुसरे बोरवेलच्या पाण्यातील असलेलले क्षार कमी करून आंघोळ व इतर कामासाठी वापरता येतो. किंमत अल्प असुन मजबूत प्रॉडक्टची निर्मिती केल्याने घरोघरी लावल्या जात आहे. जनतेच्या आरोग्यासाठी निर्मित केलेल्या या अंभु टेक प्रॉडक्ट ची दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.
अंभु टेक प्रॉडक्टचे संचालक भूपेश निमसरकर यांनी याबाबत सांगितले की, मी स्वतः पंप ऑपरेटर इन मेकॅनिकचा अभ्यासक्रम केला असल्याने २० वर्षाचा यात अनुभव आहे. त्यामुळे जनतेला कमी किंमतीत शुद्ध पाणी देता यावे असे काही करावे हा विचार माझ्या मनात होता. मात्र मार्ग काही मिळत नव्हता. एके दिवशी माझ्या घरची टाकी साफ करण्यासाठी खाली उतरलो असता त्यातील
धूळ, माती, चीला, क्षार आणि रेतीचे कण बघून चक्रावलो. टाकीच्या तळाशी असलेले धूळ, गाळ, माती हे या मिश्रित स्वरूपात येणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे पाईपलाईन, नळाच्या टोप्या, आरो फिल्टर, बरेचदा खराब होत असल्याचे दिसून आले. या सर्व प्रकारावर उपाय म्हणून जास्त काळ टिकणारे आणि कुठल्याही प्रकारचे मेंटेनन्स नसणारा अंभु टेक प्रॉडक्ट फिल्टर तयार केला आहे. हा फिल्टर टाकीचा पाईप लाईनला लावल्यास यापूर्वी होणाऱ्या समस्यांना सामना करावा लागणार नाही. असे ठामपणे भूपेश निमसरकर यांचे म्हणणे आहे.
अंभु टेक कंपनी चे ' इन लाईन सिंगल सेडीमेंट
वॉटर फिल्टर आहे असुन स्वच्छ पाण्यासाठी नवीन फिल्टर आहे. नवीन
तंत्रज्ञानावर आधारित असलेले नळ फिल्टर आहे, जे विहीर, बोरवेल, नगरपंचायतीच्या दूषित पाण्यातील रेती, गाळ आणि अशुद्धता सहज अडवून सुरक्षित पिण्याचे पाणी ,स्वयंपाकाचे पाणी वापरण्यास मदत करते. यात हा फिल्टर मुख्य पाण्याच्या लाईनमध्ये नळाला बसवला जातो.
त्याची खास सेडीमेंट पोलोप्रोफिलिन मटेरियल टेक्नॉलॉजीने पाण्यातील रेती, गाळ, धूळ, गंजाचे कण आणि इतर अशुद्धता प्रभावीपणे अडवते.
हा फिल्टर विहीर, बोरवेल आणि नगरपंचायत, ग्राम पंचायतमध्ये पाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
कंपनीने ग्रामीण आणि शहरी भागातील पाणी समस्यांचा सखोल अभ्यास करून हा उत्पादन विकसित केला आहे.
हा फिल्टर्स घरगुती , फ्लॅट्स, शाळा, दवाखाने, ,कारखाने आदी ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी उपयुक्त आहेत. पाण्याचा प्रेशर कमी न करता स्वच्छता प्रदान करणे, कमी मेंटेनन्स सुविधा.
फिल्टर → स्वयंपाकासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी.अंभू टेक फिल्टर म्हणजे शुध्द पाण्याची नवी ओळख असणार आहे.त्यामुळे काही दिवसात ’हर घर अंभू टेक फिल्टर ’ असे चित्र दिसणार आहे एवढे मात्र निश्चित!
अधिक माहिती साठी श्री .भूपेश निमसरकर मोबाईल क्रमांक :9922836688 असुन कार्यालय तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, गजानन मंदिराजवळ मूल जिल्हा चंद्रपूर यांचेंशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
