विद्यार्थ्यांनी सादर केले तब्बल ५० नृत्य व नाटिका!
सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी नृत्यांची धूम बघायला मिळाली.
या कला महोत्सवाचे उद्घाटन भाजपाच्या नेत्या तथा जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरुनुले यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. मारोतराव पुल्लावार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक महेंद्र करकाडे, मिलिंद खोब्रागडे, नगर परिषद मूल चे माजी उपाध्यक्ष प्रवीण मोहूले, ज्येष्ठ पत्रकार युवराज चावरे, सामाजिक कार्यकर्ते पंकज लाडवे, ईश्वर लोनबले,
गीताचार्य गणेश मांडवकर, सुखदेव चौथाले, शाळा समितीचे सदस्य अमोल बोबाटे,
रमेश बोरकर, मनोहर मेश्राम, शाळा समितीच्या सदस्या
ज्योती मोहबे, शुभांगी चावके, गीता अमरदूर्तीवार, चेतना भोयर, दिव्या गोवर्धन, वंदना चौखुंडे, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम आदी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी संध्याताई गुरुनुले यांनी कला महोत्सवाच्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात येऊन मशालीच्या माध्यमातून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन करताना संध्याताई गुरुनुले यांनी
विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवित असल्याने शाळेचा गौरव करीत या कला महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्याची कला प्रदर्शित केली जाणार आहे.विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानत शाळेच्या उपक्रमात पालकांचा समावेश करणे ही बाब देखील कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवरांनी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधत असल्याचे प्रतिपादन करून भविष्यात शाळा प्रगतीकडे वाटचाल करेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नर्सरी ते इयत्ता आठवी पर्यंतच्या ५० विद्यार्थ्यांनी नृत्य तसेच विद्यार्थ्याच्या मातांनी देखील लक्षवेधक नृत्य सादर करून उपस्थितांचे मन वेधून घेतले. तसेच विद्यार्थ्याच्या प्रबोधनात्मक
नाटिका सर्वांना लक्षवेधक ठरल्या. पाच तास चाललेल्या या नृत्याच्या कार्यक्रमात सर्वजण खिळून बसले होते. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक बंडू अल्लीवार, प्रास्ताविक पदवीधर शिक्षक राजू गेडाम तर उपस्थतांचे आभार सहाय्यक शिक्षक योगेश पुल्लकवार यांनी मानले.
