विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांचे उपजत गुण प्रदर्शित व्हावे या उद्देशाने सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी क्रीडा संमेलनाचे उद्घाटन नगर परिषद मूल च्या नगराध्यक्षा एकता समर्थ यांच्या हस्ते थाटामाटात करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील मारकवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद मूल चे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती राकेश रत्नावार, नगर परिषद मूल चे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नगर परिषद मूल च्या महिला व बालकल्याण सभापती नलिनीताई आडपवार, नगरसेवक नितीन गद्देवार, विवेक मृत्यलवार, राहुल प्रेमलवार, शालुताई शेरकी, अश्विनीताई निकोडे, प्रचिताई आक्केवार, उज्वलाताई कामडी, सुशीलाताई खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड खोब्रागडे, मनीष येलल्टीवार, माजी सैनिक मारुती कोकाटे, अविनाश बंडावार, मिथुनसिंग पटवा, माता पालक समितीच्या अध्यक्षा गायत्री मडावी, उपाध्यक्ष उषाताई थोराक, शाळा समितीच्या मोनिका रोहनकर, शिल्पा ईटनकर, कल्याणी मांदाडे, रजनी सलामे, हुसेन जराते, सुनील जराते, रुमदेव गोहणे, डॉ. पद्माकर लेनगुरे, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप आदी मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शाळेत वर्षभरात विविध उपक्रम राबविले जाते. यात पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने शाळेची पटसंख्या वाढतच आहे. शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवून शाळेची प्रगती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी सांगितले.उपस्थित मान्यवरांनी क्रीडा महोत्सवाचे विधिवत उद्घाटन केल्याने क्रीडा ध्वज फडकविण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना बँडच्यातालात बँड प्रमुख शिक्षक योगेश पुल्लकवार व अजय राऊत यांनी सुंदर संचालन करीत मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल विविध उपक्रम राबवित विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करीत आहे आहे. हे खरोखरच कौतुकास्पद असुन नगर पालिका भविष्यात शाळेच्या उपक्रमात सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या वेळी नगर परिषद मूलचे उपाध्यक्ष राकेश रत्नावार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, डेव्हिड खोब्रागडे आदींनी आपले विचार मांडले.अध्यक्षस्थानावरून रुपेश पाटील मारकवार यांनी शाळा वर्षभर विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याने शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप व त्यांचे सहकारी शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळेची प्रगती अशीच निरंतर सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका रीना मसराम, प्रास्ताविक मुख्याध्यापक अविनाश जगताप तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक राहुल मुंगमोडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पालक व शिक्षक वृंदानी विशेष परिश्रम घेतले.