पंचायत समिती मूल अंतर्गत येणारे सुशी दाबगाव क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या प्रवर्गातून अनेक इच्छुक उमेदवार पुढे येताना दिसत आहेत. मात्र या सर्वांमध्ये काँग्रेस पक्षाकडून जानाळा येथील युवा पत्रकार व काँग्रेसचे सक्रिय युवा कार्यकर्ते धनराज रामटेके यांच्या नावाची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.
धनराज रामटेके हे धडाडीचे, अभ्यासू व लोकाभिमुख युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात असून सुशी दाबगाव, केळझर, चिरोली, टोलेवाही, जानाळा, आगडी, फुलझरी आदी गावांमध्ये त्यांचा जनसंपर्क भक्कम आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक भावना आहे.
“आपल्या पंचायत समिती क्षेत्रात धनराज रामटेके यांच्यासारखे तरुण, संवेदनशील व कार्यक्षम नेतृत्व असावे,” अशी चर्चा सध्या सुशी दाबगाव व परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीकडे परिसरातील जनता मोठ्या आशेने पाहत आहे.
दरम्यान, नगर परिषद मूल येथे काँग्रेस पक्षाची बहुमताने सत्ता आल्याने पक्षाचे मनोबल वाढले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर होईल, अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अशा परिस्थितीत धनराज रामटेके यांना काँग्रेसकडून पंचायत समितीची उमेदवारी दिल्यास परिसरातील जनतेच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यास ते सक्षम ठरतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून धनराज रामटेके यांच्या नावाला उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा सध्या सुशी दाबगाव व आसपासच्या परिसरात रंगली आहे.
