केळझर–चिचाळा जिल्हा परिषद क्षेत्रात सौरभ ची चर्चा !


कणखर, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जोडलेले युवा नेतृत्व – सौरभ हसन वाढई



रवि वाळके / दे दणका न्यूज मूल

जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राज सुरू असल्याने सर्वसामान्य जनतेची कामे रखडल्याची तीव्र नाराजी ग्रामीण भागात दिसून येत आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या प्रतिनिधींचा अभाव असल्याने “आता निवडणुका हव्यातच” अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची दाट शक्यता असून, राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.
केळझर–चिचाळा हे जिल्हा परिषद क्षेत्र यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेक राजकीय पक्षांमध्ये दावेदारांची चढाओढ सुरू आहे. मात्र काँग्रेस पक्षाकडून कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल चे संचालक हसन वाढई यांचे चिरंजीव – सौरभ हसन वाढई यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे.
सौरभ हसन वाढई हे तरुण, कणखर व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. युवकांची मजबूत फळी त्यांच्या पाठीशी उभी असून, जनसामान्यांच्या प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठविताना दिसत आहेत. ग्रामीण भागात वाढलेले, गावखेड्यांच्या अडचणी जवळून अनुभवलेले हे नेतृत्व असल्याने केळझर–चिचाळा परिसरात त्यांचा जनसंपर्क आजही भक्कम आहे.
लोकांमध्ये राहून, लोकांसाठी काम करणारा नेता” अशी सौरभ वाढई यांची ओळख निर्माण झाली असून, विकासाभिमुख दृष्टीकोन असलेले नेतृत्व म्हणून जनता त्यांच्याकडे आशेने पाहत आहे.
विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार आणि जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी अध्यक्ष तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषभाऊ रावत यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव वाढई जनहिताच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करीत आहेत.
पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास, “संधीचे सोने करत केळझर–चिचाळा जिल्हा परिषद क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधू” असा ठाम संकल्प सौरभ हसन वाढई यांनी व्यक्त केला आहे. जनसेवेची संधी मिळेल, आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरेल, अशी आशा आता या संपूर्ण क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.