भाजपाच्या उमेदवाराला धक्का देत प्रशांतने बुडविली भाजपची सत्ता!

मूल नगर परिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता!

नगराधक्षासह काँग्रेसचे १८ विजयी 




रवि वाळके /दे दणका न्यूज मूल 
 

 मूल नगर परिषदेवर भाजपची सत्ता उलथवून टाकत 
भाजपाच्या उमेदवाराला धक्का देत प्रशांतने प्रणयकारी भुकंप आणत भाजपची सत्ता बुडवीत नगराध्यक्षासह १८ उमेदवार विजयी करण्यात मोलाची भूमिका बजाविली. काँग्रेसचे माजी गटनेते, माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली ही विजयी पताका फडकल्याचे सांगत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा मनोदय नवनिर्वाचित नगराध्यक्ष 
एकता समर्थ व नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी व्यक्त केला आहे.

      नगर परिषद मूल च्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन होईल असे बोलल्या जात होते. भाजपाने दिलेल्या उमेदवारापेक्षा काँग्रेसचे उमेदवार तगडे असल्याने काँग्रेसचा बोलबाला दिसुन येत होता. त्या अनुषंगाने आज जाहीर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 
काँग्रेसने नगराध्यक्षासह १८ नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आणत एकहाती सत्ता बसविली आहे. काँग्रेसच्या एकता प्रशांत समर्थ यांना ७९५४ तर भाजपाच्या किरण किशोर कापगते यांना ५८७३ मते मिळाली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ २०८१ मतांनी आघाडी घेत निवडून आल्या आहेत. यात तिसऱ्या क्रमांकावर बसपाच्या चैताली मल्हारी मद्रीवर ५११ मते घेतली.यावेळी भाजपला नगरसेवक पदासाठी फक्त दोनच जागेवर समाधान मानावे लागले आहे. यात विशेष म्हणजे विजयी भाजपाच्या दोन्ही महिला नगरसेवक असल्याने आपली विरोधी प्रबळ बाजू मांडायला पुरुष मंडळी नसल्याने नगर परिषदेत काँग्रेसचा दबदबा असणार आहे.
      नगर परिषद मूल येथे गेल्या अनेक वर्षापासून भाजपची एकहाती सत्ता होती. मागील सन २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने नगराधक्षा सह १७ पैकी १६ नागसेवक निवडून आले होते. यावेळी काँग्रेसला फक्त एका जागेवरच समाधान मानावे लागले होते. यावेळी मात्र याउलट मतदारांनी काँग्रेसला झुकते माप देत २० पैकी १८ नगरसेवक निवडून आणत मूल नगरपरिषदेवर सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. भाजपाने यावेळी अनेक उमेदवार नापसंतीचे दिल्याने अनेकांच्या मनात नाराजी दिसत होती. माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार हे मूल नगराच्या विकासाठी भरीव योगदान दिले असले तरी नगरसेवक या नात्याने स्वतःच्या पुढाकाराने विकासात्मक काहीच केले नसल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. तेच मतदारांनी या निवडणुकीत दाखवुन दिले आहे. 

 नगर परिषद मूल च्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी विजयी व पराभूत झालेल्या उमेदवाराला खालील प्रमाणे मतदान मिळाल्याचे दिसुन येत आहे.

 
एकता प्रशांत समर्थ (काँग्रेस) विजयी - ७९५४
किरण किशोर कापगते (भाजपा) पराभूत - ५८७३
चैताली मल्हारी मद्रीवर (बसपा)- पराभूत- ५१२ 
तर 
नगर सेवक पदाचे विजयी व पराभूत पुढील प्रमाणे आहेत.

प्रभाग १ अनु. जमाती 
काजल दीपक धारणे( काँगेस) विजयी - ८६१

संजना रविंद्र मडावी (भाजपा) - पराभूत - ५०४

प्रभाग १ ब सर्वसाधारण

प्रशांत विलास समर्थ (काँग्रेस) विजयी - ९७३
 अजय सुधाकर गोगुलवार (भाजपा) पराभूत - ४७५

प्रभाग २ अ. ना मा प्र (महिला)

अश्विनी रुपेश निकोडे (भाजपा) विजयी - ७७८
पायल सुनील महाडोरे (काँगेस) पराभूत - ७४३

प्रभाग २ ब सर्वसाधारण 

तुकाराम पुंडलिक गुरनुले(कांग्रेस) विजयी - ६१६

सूरज रमेश मांदाडे (भाजपा) पराभूत - ५९७

प्रभाग ३ अ सर्वसाधारण 
 शालू किसन शेरकी (कांग्रेस) विजयी- ६६५

आचल किशोर चौखुंडे (भाजपा) पराभूत - १८०

प्रभाग ३ ब नामाप्र (महिला)

मिथुन प्रकाश गद्देवार (काँग्रेस) विजयी- ९६०

प्रशांत रामचंद्र बोबाटे(भाजपा) पराभूत - ४१७


प्रभाग ४ अ. ना मा प्र सर्वसाधारण 

राकेश यादवराव रत्नावार (काँग्रेस) विजयी - ७९०

अनिल भाऊराव साखरकर (भाजपा) पराभूत - २८०

प्रभाग ४ ब सर्वसाधारण (महिला)
 
उज्वला अंकुश कामडी(काँग्रेस)विजयी - ६६३

लीनाताई अनिल बद्देलवार (भाजपा) पराभूत - ३९२

प्रभाग ५ अ नामाप्र (महिला)

प्राची आनंद आक्केवार (भाजपा) विजयी- ७३४

भारती गणेश मेश्राम (काँग्रेस) पराभूत - ६९७

प्रभाग ५ ब (सर्वसाधारण)

रीतीक दिनेश गोयल (काँग्रेस) विजयी- ८०७

जितेंद्र देविदास टिंगुसले(भाजपा) पराभूत - ५६३

प्रभाग ६ अ ना मा प्र (सर्वसाधारण)

विवेक बळवंतराव मृत्यलवार( काँग्रेस)विजयी - ८२५
नंदकिशोर मुरलीधर रणदिवे (भाजपा) पराभूत - ३९२

प्रभाग ६ ब सर्वसाधारण (महिला)
 
नलिनी दिनेश आडपवार(काँग्रेस)विजयी- ७९६

आशा मनोहर गुप्ता (भाजपा) पराभूत - ३९२

प्रभाग ७ अ अनु. जमाती सर्वसाधारण 

अशोक हिरामण येरमे (कांग्रेस) विजयी- ७१८
झकास भागवत कुमरे (भाजपा) पराभूत - ५८४

प्रभाग ७ अ. सर्वसाधारण महिला 

समीक्षा जगदीश कडसकर (काँग्रेस) विजयी - ५५३
 माधुरी महेंद्र करकाडे (भाजपा) पराभूत - ४९३

प्रभाग ८ अ. अनुसूचित जाती सर्वसाधारण

अतुल रवि गोवर्धन(काँग्रेस) विजयी- ६६७
मिलिंद राजाराम खोब्रागडे (भाजपा) पराभूत - ६४१

प्रभाग ८ ब सर्वसाधारण महिला 

ज्योती चंद्रकांत चटारे (काँग्रेस ) विजयी - ९३७
अपर्णा गुरुदास भेंडारे (भाजपा) पराभूत- ४४८

प्रभाग ९ अ. अनुसूचित जाती महिला 

ललिता सुरेश फुलझेले(काँग्रेस) 
 विजयी - ५९६

पूजा जपान रामटेके (भाजपा) पराभूत - ३७५

प्रभाग ९ ब. सर्वसाधारण 

विलास पांडुरंग कागदेलवर
(काँग्रेस ) विजयी- ४७५
प्रशांत मार्कंडी लाडवे (भाजपा) पराभूत- ३३८

प्रभाग १० अ अनुसूचित जाती महिला 
सुशीला डेव्हिड खोब्रागडे(काँग्रेस) विजयी- ८६७
 बिंदू विलास जुमडे (भाजपा) पराभूत- ७२९

प्रभाग १० ब.सर्वसाधारण

राहुल सुरेश प्रेमलवार( काँग्रेस) विजयी- ८५४
निलेश देवराव रॉय (भाजपा) पराभूत- ६५१
   एकंदरीत नगर परिषद मूल येथे प्रशांत रुपी महासागराने भाजपची सत्ता उलथवून टाकत काँग्रेसची सत्ता खेचुन आणली आहे. काँग्रेसने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या जाहीरनाम्याच्या अनुषंगाने कितपत खरे ठरतात हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.