माजी मंत्री ,विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मूल नगर परिषदेचा जाहीरनामा धूमधडाक्यात लोकार्पण !



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 
  मूल नगर परिषदेची निवडणूक येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी होत आहेत. भारतीय
राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून लढविले जात आहे. माजी मंत्री, विरोधीपक्ष गटनेते तथा आमदार मान. विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार मान. प्रतिभाताई धानोरकर, आमदार मान. सुधाकररावजी अडबाले, आमदार मान. अॅड. अभिजीतजी वंजारी, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे, माजी आमदार मान. देवरावजी भांडेकर यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा परिषद, जि.म. सह. बँक आणि मूल नगर परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मान. संतोषभाऊ रावत यांचे नेतृत्वात नगराधक्षाच्या उमेदवार सौ. एकता प्रशांत समर्थ व २० नगरसेवक  निवडणुक लढवित आहेत . जनतेची सेवा, प्रभागाचा विकास आणि सामुहिक कल्याण डोळ्यासमोर ठेवला असून यासाठी आम्ही सदैव वचनबध्द राहू असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

2016 पासून ते आजपर्यंतचा कार्यकाळ लक्षात घेतल्यास आजही प्रभागाच्या अनेक समस्या कायम आहेत. स्वकर्तृत्वाने नव्हे तर शासकिय योजना आणि निधीमधून ज्येष्ठ नेत्याने केलेला बांधकामाचा विकास म्हणजे जनतेची सेवा आणि शहराचा विकास यात धन्यता माणुन तत्कालीन नगरसेवकांनी नागरीकांच्या मुलभुत समस्या आणि गरजांची पुर्तता करण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही. सात दिवस चोवीस तास पाणी पुरवणारी 28.88 कोटीची वाढीव पाणी पुरवठा योजना, 2.99 कोटीचा ओपन स्पेस विकास, घनकचरा व्यवस्थापन योजनेत करारानुसार काम न होताही लाखोचे देयक मंजूर करणे, नगर परिषद द्वारा करण्यांत येणाऱ्या विविध बांधकामाचे ठेके घेवून लोकनिधीला चुना लावणे, याशिवाय परिसर स्वच्छता, नाल्यांची नियमित सफाई, शुध्द पाण्याचा मुबलक पुरवठा, जनतेला परवडण्या योग्य मालमत्ता व पाणी कर, नगर परिषदेद्वारा दिल्या जाणाऱ्या विविध दाखल्यांची तात्काळ उपलब्धता, अवाजवी वाढविलेले कर आदि जनहिताचे महत्वपूर्ण कार्ये त्यांनी कधीही केलेले नाही. या सर्व प्रकारामुळे आपणंच नव्हे तर समस्त मूलवासीय जनता भारतीय जनता पार्टी वर प्रचंड नाराज आहे. म्हणूनच जनतेच्या मूलभुत गरजांची पुर्तता करण्यासाठी विकास आणि सेवेचा वसा घेवून जनतेला  प्रत्यक्ष भेट देत आहेत.

नगर परिषदेच्या वतीने जनतेच्या मुलभुत गरजा आणि अडचणीचे निराकरण करून समाधान करण्यासाठी होवू घातलेल्या नगर परिषद निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीच्या वतीने नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष, मनमिळावू आणि लोकप्रिय माजी सभापती श्री. प्रशांत विलासराव समर्थ यांच्या सुविद्य पत्नी सौ. एकता प्रशांत समर्थ हया नगराध्यक्ष पदाकरीता निवडणुक लढवित असून आम्ही आपल्या प्रभागाच्या नगर सेवक पदाकरीता निवडणुक लढवित आहोत. आमचे निवडणुक चिन्ह हाताचा पंजा असून पंजा या बोधचिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला आपली सेवा करण्याची व शहर विकासाची संधी दिल्यास संधीचे सोने करण्याची ग्वाही सर्व उमेदवार देत आहेत.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने जाहीरनामा मूल शहर विकासात मोलाची कामगिरी बजावणार आहेत.
यातील खालील समस्या निकाली काढण्याचे वचन देण्यात आले आहे.



1) दाखले, ना-हरकत प्रमाणपत्राकरीता नागरीकांना वारंवार नगर परिषदेच्या पायऱ्या चढण्यास भाग पाडले.

2) मालमत्ता फेरफार नोंदी करीता कालावधी लावणे

3) बांधकामाच्या परवानगीसाठी ताटकळत ठेवून कर्ज घेवून घर बांधणाऱ्या नागरीकांना कर्जाचे हमे व्याजासह भरण्यास भाग पाडणे

4) अंत्यसंस्कार प्रसंगी स्मशानभूमीत लाकडांची उपलब्ध करून देण्यास अपयशी

5) आरोग्याची सेवा पुरविण्यास दिरंगाई

6) आठवडाभर चोवीस तास पाणी देण्याचा शब्द शेवटपर्यंत पाळला नाही

7) फुटपाथवर व्यवसाय करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या गरीबाकडून सक्तीने कराची वसुली करणे.

8) लाखो रूपयाची तुरटी, ब्लिींग पावडर आणि साहित्य खरेदी करूनही शहरवासियांना गढूळ आणि दुषीत पाणी पुरवठा करून जनतेच्या आरोग्याशी खेळणे,

9) विकासाच्या नांवाखाली रस्ता, नाली व इमारती बांधकामाचे ठेके कार्यकत्यांना देवून विकास आणि सेवेचे काम न करणे.

10) कोट्यावधी रूपये खर्च करून बांधण्यांत आलेले व्यापारी संकुल आजही बेवारस करून ठेवले

11) अशिक्षीत आणि गरीब गरजु लाभार्थ्यांना बिपीएल दाखला देण्यास टाळाटाळ करून नाहक त्रास देणे

12) स्वच्छ, सुंदर शहर करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपाने आवश्यक ठिकाणी मुताऱ्यांची व्यवस्था न करता आहे त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरविले

13) ओपन स्पेस मध्यें सौंदर्याकरण करण्याच्या नांवाखाली शासकीय निधीचा गैरव्यवहार केला

असा राहील आमचा पाच वर्षाचा पारदर्शी कारभार

वचननामा जनहिताचा, प्रगती आणि समृध्दीचा

1) नगर परिषदेद्वारा देण्यात येणारे सर्व दाखले आणि प्रमाणपत्र चौवीस तासाच्या आंत देण्यात येईल

2) मालमत्ता फेरफार नोंदीचे काम पंधरा दिवसात पुर्ण करणार, भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक प्रशासन ठेवणार

3) घर बांधकामाची परवानगी एकेवीस दिवसात देणार

4) अंत्यसंस्कारा करीता विनामूल्य स्वर्गरथ आणि शवपेटी उपलब्ध करून देणार व मोक्षधाम येथे माफक दरात लाकडांची व्यवस्था करणार

5) शहर स्वच्छतेकरीता प्रभाग निहाय स्वच्छता समिती निर्माण करून मासीक आढावा घेणार, ओला व सुखा कचरा साठवुन ठेवण्याकरीता घरोघरी व व्यावसायीकांना विनामूल्य कचरा पेटी देणार

6) व्यवसाय करणाऱ्या फुटपाथधारकांकडून कोणताही शुल्क घेणार नाही

7) जलशुध्दीकरण केंद्र सुधारून दिवसातून दोन वेळा शुध्द व मुबलक पाण्याचा पुरवठा करणार, प्रत्येक वार्डात सार्वजनिक नळांची व्यवस्था करणार

8) बांधण्यांत आलेले सिमेंट मार्ग आणि नाली बांधकामात सुधारणा करून नागरीकांच्या घरातून जाणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावून संरक्षण दिल्या जाईल,

9) व्यापारी संकुलाचा तिढा सोडवून गरजु, गरीब बेरोजगार युवक व दिव्यांगांना रोजगारासाठी गाडे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार तसेच युवकांसाठी व्यक्तीमत्व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती

10) मालमत्ता करात करण्यांत आलेली करवाढ नियमानुसार आकारून व्याज न आकारता स्विकारल्या जाणार

11) जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी स्वतंत्र तक्रार कक्ष, समस्या ग्रुप आणि 24X7 हेल्पलाईन सुरु करणार

12) प्रमुख चौक आणि प्रभागात पुरुष आणि महिलांसाठी मुताऱ्यांची व्यवस्था करणे

13) जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येक वर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे

14) पात्र बिपीएल आणि एपिएल धारकांना दाखल्यांची उपलब्धता करून देणे

15) प्रत्येक महिण्यांत प्रभागनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करुण समस्यांचे निराकरण करणे,

16) जेष्ठ व वयोवृध्द नागरीकांसाठी आरोग्य सेवेची विशेष सुविधा उपलब्ध करून देणार

17) अग्नीशमन वाहन आणि रुग्णवाहीका दुरूस्त करून नागरीकांना सेवा देणार

18) स्वच्छ, सुंदर, हागणदारी व रोगमुक्त शहराची निर्मिती करणार

19) डांसामूळे होणाऱ्या रोगांचा नाईनाट करण्यासाठी योग्य उपाययोजना करणार

20) सुरळीत वाहतुकीसाठी स्वतंत्र ट्रॅव्हल्स बस व ऑटो स्टॅण्ड निर्मिती

21) कर्जाविना हतबल झालेल्या बचत गटातील महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार

22) पाणी पुरवठ्या करीता हरणघाट येथे एक्सप्रेस फिडर ट्रान्सफार्मर लावणार

23) शासकिय जागेवर असलेले नागरिकांचे अतिक्रमण नियमित करण्याकरीता पाठपुरावा करणार

24) जिल्हा परिषदेद्वारा सुरू असलेल्या शहरातील प्राथमिक शाळांची सुधारणा आणि डिजीटलनायझेन करण्यासाठी पाठपुरावा करणार

25) ओपन स्पेसचे सौंदर्गीकरण करुण शहराच्या वैभवात वाढ करणे,

26) मोकाट गुराढोरांसाठी सेवाभावी संस्थेला जागा उपलब्ध करून देवून गोसंरक्षण केंद्र उभारणार

27) मोकाट डुक्करांचा हैदोस थांबवण्याकरीता वराह पालन करणाऱ्यांना जागा उपलब्ध करून देणार

28) आठवडी बाजारात ठौक भाजी विक्रेत्यांना शेड व गोडावून उपलब्ध करून देणार

29) शहरातील भंगार विक्रेत्यांना शहराबाहेर जागा उपलब्ध करून देणार

30) महिलांची सुरक्षा, अनुचित घटना, गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी शहरात सिसिटीव्ही कॅमेरे अद्यावत केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.जनतेच्या निगडीत असलेल्या समस्या जाहीरनाम्यात नमूद असल्याने मूल शहराचा नक्कीच विकास होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.