मूल नगर परिषद निवडणूक : प्रभाग10 मधील दमदार उमेदवार निलेश देवराव रॉय!


  
रवि वाळके / दे दणका न्यूज मूल 
   
  सामान्य जनतेला मदत करताना कोणतीही प्रसिद्धी न करता त्यांची समस्या सोडवण्यासाठी धडपणारे युवा व्यक्तिमत्व म्हणुन  म्हणुन निलेश देवराव रॉय यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय असलेले निलेश रॉय  यांना त्यांच्या कामाची तत्परता बघुन प्रभाग 10 मधुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वसाधारण गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभागातील  समस्यांची जाण असल्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास जनतेला असल्याने त्यांना मोठा जनाधार लाभत आहे. त्यामुळे आजच्या घडीला त्यांची बाजू भक्कम असल्याचे दिसून येत आहे.


 सामान्य जनतेच्या मदत कार्यात नेहमी तत्पर असलेले व्यक्तिमत्व निलेश देवराव रॉय युवकांचे प्रेरणास्थान आहे. युवकांना भविष्यातील वेध घेणाऱ्या गोष्टीचा ऊहापोह  नेहमी करीत असतात. त्यामुळे अनेक जणांचे ते चाहते झाले आहेत. 
मृत्यू हे अटळ आहे हे सर्वश्रुत आहे.एखाद्याच्या घरी कुणी मृत्यू पावले तर त्या कुंटूबाला धीर देण्याचा प्रयत्न ते नेहमी करताना दिसतात. त्यांच्या अंत्यसाकारासाठी काही मदत देत आलेल्या नातेवाईकांसाठी अन्नदान करीत असल्याचे नागरिक सांगतात. यासाठी ते कुठलीही प्रसिद्धी करीत नाही ही त्यांच्या जमेची बाजू आहे. यातच  त्यांचा मोठेपणा यातून दिसून येतो.
गरिबाच्या हाकेला धावुन जाणारे व्यक्तिमत्व असलेले निलेश रॉय 
  रुग्णालयाचे काम असो वा इतर काम असो ते काम करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली आहे.गरजू व्यक्ती कामासाठी आला तर ते तत्परतेने होत   असल्याने जनतेच्या चेहऱ्यावर हास्य होताना दिसत आहे.त्यामुळे अनेक जणांना  मानसिक समाधान मिळत असल्याचे नागरीक सांगत आहेत.गरजू व्यक्तींना  मदत करणे हा त्यांचा नेहमीचा घ्यास असल्याने मदत करण्यास आनंद मिळत असल्याचे निलेश रॉय सांगतात.प्रभाग 10 मधील  प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला घ्यास असुन त्याची पूर्तता करणे आपले कर्तव्य असल्याचे ते मानत आहेत.
 
“नागरिकांच्या आग्रहास्तव मी रिंगणात उतरत आहे,” असे सांगत रॉय यांनी विकासाचा आराखडा तयार केला आहे.  रस्ते,  स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करून जनतेला मूलभूत असलेल्या सोई अग्रक्रमाने देण्याचा त्यांचा  संकल्प आहे.

 
 “शहर विकासासाठी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यास कटिबद्ध असल्याचे एक व सांगत प्रभागाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा संकल्प केला आहे.त्यामुळे त्यांची विजयाकडे आगेकूच करताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.