मूल नगर परिषदेची निवडणूक येत्या 2 डिसेंबर रोजी होत आहे. प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण गटातून महेश मनोहर चौधरी हे शिवसेना उबाठा कडून रिंगणात आहेत. महेश चौधरी हे गेल्या 18 वर्षांपासून शिवसेनेशी जुळले असुन एकनिष्ठ कार्यकर्त आहेत. नगर परिषदेची निवडणुकित चौधरी यांनी केलेल्या कार्यामुळे शिवसेनेने उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी शिवसेना उबाठा कडून अनेक कार्यकर्ते प्रचार करीत असुन प्रचाराचा झंझावत वाढला आहे.
श्री .महेश चौधरी यांची प्रभाग क्रमांक 1 मध्ये जनतेशी चांगली नाळ जुळली आहे. या प्रभागात सर्वसाधारण गटातून अनेक दिग्गज रिंगणात आहेत. मात्र चौधरी यांची बाजू सक्षम दिसत आहे. जनतेच्या विविध समस्यांची जाणीव असल्याने त्यांना न्याय देण्यासाठी नगर परिषदेत असणे आवश्यक आहे. यासाठी मला निवडून देण्यासाठी मतदान रुपी सहकार्य केल्यास नगरसेवक पदी निवडून येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. असेते जनतेला पटवुन देत प्रचार करीत आहेत. या सर्वसामान्य मात्र तेवढाच होतकरू कार्यकर्त्याला निवडून देण्यासाठी जनता अग्रक्रमाने सहकार्य करणार असल्याची चर्चा प्रभागात सुरू झाली आहे. नियोजनबद्ध आखणी करून डोअर टू डोअर प्रचार सुरू असल्याने जनतेचा प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यामुळे महेश चौधरी प्रचारात आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य या कार्यकर्त्याला जनता संधी देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जनतेचे सहकार्य मिळाल्यास नक्कीच चित्र बदलेल असा दावा केला जात आहे.
